वेश्याव्यवसायातील गूंड भाजपचे उमेदवार

0

पनवेल : महापालिकेत भाजपने वेश्याव्यवसाय करायला लावणार्‍या गुंडांना तिकीटें दिल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. कळंबोलीत शेकाप महाआघाडीतर्फे सभेचें आयोजन करण्यात आलें होतें. या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.

संतोष शेट्टीवर आक्षेप
भाजपनें प्रभाग क्रमांक 16 मध्ये संतोष शेट्टी या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. संतोष शेट्टीवर वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणे, घरात घुसून मारहाण करणे, असे गंभीर गुन्हा दाखल आहेत. अशा व्यक्तींना उमेदवारी देऊन भाजपने लाचारी दाखवून दिली असल्याचेंही ते यावेळी म्हणाले.धनंजय मुंडेंनी भाषणात नरेंद्र मोदींचाही समाचार घेतला. दिलेला शब्द फिरवण्यात मोदींचा हात कुणीच धरु शकणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. सरड्यालाही लाज वाटेल असे रंग शिवसेना बदलत आहे, अशी जहरी टीका धनंजय मुंडे यांनी केली. प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याने भाजपसाठी मुख्यमंत्री संध्याकाळी खारघर आणि नवीन पनवेलमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांची कामोठेमध्ये एकच सभा होणार आहे.