वेश्याव्यवसाय प्रकरणी दोघींना अटक

0

येरवडा : कल्याणीनगर येथील उच्चभ्रू सोसायटीत मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेणार्‍या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून अंदाजे सात लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शबनाज अल्ताफ मीना (28,रा. धायरी), कोमल राजकुमार चावला (31,रा. कल्याणीनगर) असे अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीची नावे असून यातील मुख्य आरोपी विपुल रॉय हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. संबंधित कारवाई ही दरोडा पथक, गुन्हे शाखा व येरवडा पोलीस यांच्या वतीने करण्यात आली. कल्याणीनगर येथील उच्चभ्रू सोसायटीत सर्रासपणे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, खडकी विभागाचे सहाय्यक आयुक्त वसंत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन, अशोक कदम,अनिल लोहार यांच्यासह पथकातील बाळासाहेब बहिरट, संतोष बडे,अजीज बेग,विष्णू सरवदे यांनी सोसायटीमध्ये सापळा रचून संबंधित महिला आरोपीसह इतर महिलांना ताब्यात घेण्यात आले. कारवाई दरम्यान आरोपीकडून 1लाख 13 हजार 400 रुपयांसह आयटेन कार असा 7 लाख 13 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.