वेश्या व्यवसायातील दलाल पोलिसांच्या जाळ्यात

0

बाजारपेठच्या विशेष पथकाची कारवाई ; जामीन मंजूर असल्याने प्रतिबंधक कारवाई करून सोडणार

भुसावळ : शहरातील वैतागवाडीत जानेवारी महिन्यात पोलिसांनी छापा टाकून ग्राहकांसह कुंटणखाना चालवणार्‍या महिलांवर कारवाई केली होती तर यातील दोघे पसार झाल्याने त्यांचा पोलिसांच्या विशेष पथकाकडून शोध सुरू होता. आरोपी रविवारी गावात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. शेख रफीक ऊर्फ बुलेट शेक शबीर (28, रा.दिनदयाल नगर, भुसावळ, मुळ रा.वरखेडी, ता.पाचोरा व कमल अतुल पाल (47, रा.दिनदयाल नगर, भुसावळ, मुळ रा.राणा घाट, धुम हुमनिया पोल, गंगापुर नोदया, पश्‍चिम बंगाल) अशी संशयीत आरोपींची नावे आहेत मात्र आरोपींनी 15 रोजीच भुसावळ न्यायालयातून जामीन घेतल्याची कागदपत्रे सादर केल्याने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल व पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय आनंदसिंग पाटील, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, प्रवीण ढाके, अनिल पाटील आदींनी आरोपींना ताब्यात घेतले.