जमैका। भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी शुक्रवारी 36 वर्षांचा झालाय. जवळपास 13 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये धोनीने भारतीय संघाला त्यानं एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय… माहीच्या 36 व्या वाढदिवसाला भारतीय संघ वेस्टइंडिजमध्ये आहे.
शेवटच्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवल्यानंतर संघाने धोनीचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. क्रिकेटर हार्दिक पंड्याने धोनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडिओत धोनी केक कापताना दिसतोय. केप कापल्यानंतर सगळ्यांनी धोनीच्या तोंडालाही केक लावला. हा फोटो शेअर करताना पंड्यान म्हटलंय हॅप्पी बर्थडे माही ब्रो…