लोणावळा : वेहरगाव कार्ला (ता मावळ) एकवीरा देवी मंदिराच्या पायथ्याशी सामुदायिक विवाह सोहळ्यात सर्वसाधारण कुटुंबातील 15 जोडपी विवाहबध्द झाली. श्री एकवीरा जोगेश्वरी अन्नदान ट्रस्टच्या वतीने आयोजन होते. सोहळ्यात मावळातील दुर्गम भागातील हजारो वर्हाडींच्या साक्षीने ही जोडपी विवाहबंधनात बांधली गेली. सोहळ्याची सुरुवात साखरपुडा व हळद कार्यक्रमाने झाली. विशेष म्हणजे मावळ भाजपा युवामोर्चाचे माजी अध्यक्ष संभाजी येवले यांची मुलगी गौरी हिचा विवाह सुद्धा सोहळ्यात पार पाडत येवलेंनी नवा आदर्श मावळातील जनते समोर ठेवला आहे.
हे होते प्रमुख वर्हाडी
विवाह सोहळ्यात मावळचे आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिंगबर भेगडे, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, शिवसेना नेते मच्छिंद्र खराडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश ढोरे, तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, विवेक सोपरकर, जि.प. सदस्य बाबुराव वायकर,सदस्या कुसुमताई काशिकर, शोभा कदम, पं.स. सभापती गुलाबराव म्हाळस्कर, उपसभापती शांताराम कदम, सदस्य दत्तात्रय शेवाळे, महादू उघडे, सदस्या राजश्री राऊत, संचालक साखरकारखाना ज्ञानेश्वर शिंदे, माजी नगरसेवक गणेश भेगडे, श्री ट्रस्टचे अजय शिरोली, सरंपच निलम येवले, उपसरपंच दत्तात्रय पडवळ, अमितकुमार बँनर्जी, अमोल केदारी, बिनेशभाई इनामदार, पंकज गदिया यांच्यासह हजारो वर्हाडी मंडळी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
संयोजन विवाह सोहळा समिती अध्यक्ष सुरेश गायकवाड, कार्याध्यक्ष तानाजी पडवळ, संस्थापक अध्यक्ष मिलिंद बोत्रे, माजी अध्यक्ष भरतभाई मोरे, माजी अध्यक्ष दीपक हुलावळे, खरेदी विक्री संघ चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, संजय देवकर, किरण हुलावळे, संभाजी येवले, मधुकर पडवळ, बबनराव माने, राजू देवकर, रघूनाथ मराठे, गुलाबराव तिकोणे, नंदकुमार पदमुले, विवेक सोपरकर, रोहित सोपरकर, चंद्रकांत देवकर, बबनराव माने, श्रीरंग पडवळ, किरण येवले, दशरथ देवकर, दत्तात्रय बोत्रे, वसंतराव माने, हुकाजी गायकवाड, नंदकुमार पदमुले, भरत येवले, संजय देवकर, दत्तात्रय मांडेकर, एकनाथ गायकवाड,मनोज देशमुख, युवराज पडवळ, नवनाथ पडवळ, मोरेश्वर पडवळ, रामभाऊ गोणते, रोहिदास हुलावळे, मंगेश देशमूख, संतोष गायकवाड आदींनी केले होते. प्रास्ताविक भरत मोरे, सूत्रसंचालन जितेंद्र बोत्रे, किरण हुलावळे, तानाजी पडवळ यांनी केले.