वेहरगाव दहिवली सरपंचपदी दत्तात्रय पडवळ

0

लोणावळा : वेहरगाव दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरंपचपदी दत्तात्रय मारुती पडवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान सरंपच नीलम किरण येवले यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवड प्रक्रिया पार पडली. त्यात दत्तात्रय पडवळ यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एच. एल. भोकरे व कार्ला तलाठी घन:श्याम सोमवंशी, ग्रामसेवक पी. बी. पाटील यांनी जाहीर केले.

यांची होती उपस्थिती
नवनिर्वाचित सरपंच दत्तात्रय पडवळ यांचा उपसरपंच सचिन येवले, माजी सरपंच नीलम येवले, माजी सरपंच संतोष रसाळ, माजी उपसरपंच राखी पडवळ, सदस्य चंद्रकांत देवकर, सदस्या कल्पना माने, द्रोपदाबाई गायकवाड, सपना देशमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी माजी सरपंच गणपत पडवळ, शिवसेना उपतालुका प्रमुख सुरेश गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर पडवळ, तानाजी पडवळ, किरण येवले, कैलास पडवळ, बबनराव माने, युवराज पडवळ, मोरेश्वर पडवळ, शंकर पडवळ, जयवंत देशमुख, मनोज देशमुख, अनिल गायकवाड, पांडुरंग बोत्रे, दिनेश पडवळ, योगेश पडवळ, रामचंद्र पडवळ, विजय येवले उपस्थित होते.