वैजनाथ येथील वाळू घाटाची आज होणार मोजणी

जिल्हाधिकार्‍यांना सायंकाळपर्यंत अहवाल सादर होणार

जळगाव – एरंडोल तालुक्यातील वैजनाथ येथील वाळू घाटातून क्षमतेपेक्षा अधिक वाळु उपसा होत असल्याची तक्रार अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती. तसेच या वाळु घाटाचे मोजमाप करून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. त्यानुसार वैजनाथ वाळु घाटाची उद्या दि. २८ रोजी सकाळी ८ वा. मोजणी केली जाणार आहे. या मोजणीचा अहवाल सायंकाळपर्यंत जिल्हाधिकार्‍यांना सादर केला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.