वैजनाथ वाळु घाटाच्या चौकशीसाठी समिती गठीत
२८ पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश ; समितीत अध्यक्षांसह आठ सदस्यांचा समावेश
जळगाव – एरंडोल तालुक्यातील वैजनाथ येथील वाळू घाटातून क्षमतेपेक्षा अधिक वाळु उपसा होत असल्याची तक्रार अॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती. तसेच या वाळु घाटाचे मोजमाप करून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली होती. त्यानुसार वैजनाथ वाळु घाटाच्या चौकशीसाठी जिल्हा प्रशासनाने महसूल उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती गठीत केली आहे. दरम्यान या समितीने दोन दिवसात वाळु घाटाची चौकशी करून दि. २८ पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.