वैजनाथ वाळू घाटाच्या मोजणीवर तक्रारदाराची तीव्र हरकत
चौकशी समितीकडुन मोजणी पूर्ण ; सोमवारी जिल्हाधिकार्यांना अहवाल देणार
जळगाव – एरंडोल तालुक्यातील वैजनाथ येथील वाळू घाटातून क्षमतेपेक्षा अधिक वाळु उपसा होत असल्याची तक्रार अॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीकडुन आज वैजनाथ वाळू घाटाची महसूल, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोजणी करण्यात आली. मात्र चौकशी समितीच्या या मोजणीबाबत आपण समाधानी नसल्याची प्रतिक्रिया तक्रारदार अॅड. विजय पाटील यांनी दिली. दरम्यान शासनाने मोजणी केली आहे. ते त्यांचा अहवाल देतील. त्यानंतरच अहवालात काय आहे हे समजेल. अहवाल आल्यानंतरच प्रतिक्रीया देता येईल असे श्रीश्री इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.चे श्रीराम खटोड यांनी सांगितले. चौकशी समितीने मोजणी पूर्ण केली असुन सोमवारी दि. 31 रोजी जिल्हाधिकार्यांना मोजणीचा अहवाल सादर केला जाणार आहे.