यावल येथील एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारींची उपस्थिती
चोपडा : चोपडा येथील भागिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयाच्या बी.एस.डब्ल्यू. व एम.एस.डब्ल्यू. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या ग्रामिण शिबीरास सोमवार 12 रोजी पासून तालुक्यातील वैजापूर येथे सुरुवात झाली. शिबीराचे उद्घाटन चोपडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मनिषा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल येथील एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी राजकुमार हिवाळे होते. शिबिराचे उद्घाटन रोपांना पाणी देऊन मान्यवरांच्या हस्ते निसर्गपूजनाचा संदेश देण्यात आला. राजकुमार हिवाळे म्हणाले, केवळ पदवी घेऊन ती मिरवण्यापेक्षा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावे. जीवनात यशस्वी लोकांच्या जीवनावरुन बोध घ्यावा व समाजाचे जागरूक राहून निरिक्षण करावे शिबिर संपल्यानंतर एक ध्येय घेऊन परत जावे. शिबीरा दरम्यान नेतृत्व विकास-आरोग्य संवर्धन-जनजागृती आणि लोकसहभागातुन ग्रामिण विकास या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार असुन श्रमदान व गावाचे सर्वेक्षण या प्रकारे प्रात्यक्षीक कार्य केले जाणार आहे.
ग्रामिण शिबीरास यांची होती उपस्थिती
नगरसेवक जीवन चौधरी, भुपेंद्र गुजराथी, अश्विनी गुजराथी, प्राचार्य डॉ.सौंदाणकर, मुख्याध्यापक एन.पी.न्हावी, वैजापुर क्षेत्राचे वनाधिकारी एम.बी. पाटील, वैजापुर येथील सरपंच अमलीबाई बारेला, पोपा भास्कर कोळी, प्रा.आशिष गुजराथी, पत्रकार संजय बारी हे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.डॉ. विष्णू गुंजाळ यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.नारसिंग वळवी व सूत्रसंचालन प्रा.संबोधी देशपांडे यांनी केले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी प्रा.शैलेष पाटील, डॉ.मारोती गायकवाड यांनी परीश्रम घेतले.