वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी प्रदर्शन उपयोगी : सलीम शेख

0

इंदापूर । मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी प्रदर्शनासारखे उपक्रम मार्गदर्शक ठरू शकतात. वाचन संस्कृती वाढली पाहिजे. महापुरुषांचे आत्मचरित्र वाचले पाहिजे. अवांतर वाचनाने सामान्य ज्ञानात भर पडते तसेच शब्दांचा संग्रह वाढतो, असे सांगत साथी सलीम शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयात सोमवारी ग्रंथप्रदर्शन व विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. यावेळी साथी सलीम शेख कैलास कदम, सुनिता कदम, रमेश शिंदे, सिद्धार्थ मखरे उपस्थित होते.

ग्रंथालयात जवळपास 4500 पुस्तके उपलब्ध आहेत.विज्ञान प्रदर्शनात 120 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन 75 प्रयोगांचे सादरीकरण केले. अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात आले होते. ग्रंथालयाचे उदघाटन केंद्रप्रमुख सुनिता कदम यांचे हस्ते झाले. विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम यांनी केले.लेखक आपल्या भेटीला या उपक्रमातून साथी सलीम शेख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कदम म्हणाल्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहिले. त्यावेळी 18-18 तास अभ्यास करत होते. जगातील अनेक धर्मग्रंथांचा, साहित्याचा त्यांनी अभ्यास केला. पुस्तके हेच आपले मित्र आहेत. विज्ञान शिक्षिका आश्‍विनी भिसे,अर्चना अनारसे,कल्याण देवडे,बाबासाहेब साळुंके, ग्रंथपाल पुष्पा लोंढे,प्रिया भोंग,निलकंठ शिंदे,अंकुश फुले यांनी नियोजन केले. स्वागत पर्यवेक्षक माणिक जाधव यांनी केले. सूत्रसंचालन सुनिल मोहिते यांनी केले.संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.