भुसावळ- शहरातील जामनेर राेडवरील वैतागवाडी येथे बाजारपेठ पाेलिसांनी रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक छापा टाकून तेथून ११ महिला व सहा अांबट शाैकीनांना पाेलिसांनी अटक केली. त्यांच्या विरूध्द पाेलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. यामुळे अांबट शाैकीनांमध्ये खळबळ उडाली. वैतागवाडीत वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती बाजारपेठ पाेलिस ठाण्याचे निरीक्षक देवीदास पवार यांना मिळाल्याने त्यांनी सहायक फाैजदार अंबादास पाथरवट यांच्यासह डीबी पथकातील पाेलिस कर्मचाऱ्यांनी वैतागवाडी गाठली. यावेळी पाेलिसांनी अचानक कारवाई करीत वैतागवाडीमधून ११ महिला अाणि सहा पुरूषांना ताब्यात घेतले. सर्वांना बाजारपेंठ पाेलिस ठाण्यात अाणून त्यांच्या विरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात अाली. साेमवारी सर्वांना न्यायालयासमाेर हजर केले जाणार असल्याचे निरीक्षक पवार यांनी सांगितले. पाेलिसांनी अचानक केलेल्या कारवाईमुळे त्या परिसरात खळबळ उडाली.