असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटस वतीने एक दिवसीय परिषद
हडपसर : वकील शब्दांचे मांत्रिक असतात, वकिलांचे सल्ले केव्हाही फिरविले जातात, नैतिकता, नीतिमत्ता हे व्यवसायास बांधील आहेत, वैद्यकीय अधिकर्यांवर हल्ले अंतर्मुख करणारे आहेत, कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी डॉक्टरांना अटक करावे याचे समर्थन नाही. समाजात पोलिसांची अनामिक भीती असते. विचारमंथनातील सूचना सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. वैद्यकीय मंत्र्यांकडे शिष्टमंडळ घेऊन गेले पाहिजे. असे आवाहन पद्मश्री अॅड.उज्वल निकम यांनी केले. असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटस पुणे विभागाच्या वतीने एएमसी मिलकोन मीडिया लीगल कॉनफ्ररन्स ही एक दिवसीय परिषद सुझलॉन मगरपट्टा येथ आयोजित करण्यात आली होती. डॉक्टरांवर होणारे हल्ले, कारणे व उपाययोजना हे या विषयावर मार्गदर्शन करताना निकम बोलत होते.यावेळी ससूनचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले सह पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, डॉ. स्मिता शर्मा, डॉ.अनुराधा जाधव, पुण्याचे उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे, डॉ.कपूर, संस्थेचे अध्यक्ष डॉ.दिलीप माने उपस्थित होते.
रुग्णालयांशी संबंधित अडचणी, तत्काळ वैद्यकीय मदत, हल्ले झाल्यास मनुष्यबळ, संघटित रहावे, डॉक्टरांना प्रशिक्षण असे विविध उपक्रम या संघटनेच्या माध्यमातून करीत असल्याची माहिती डॉ. दिलीप माने यांनी दिली. या परिषदेमध्ये हडपसर व पुण्यातून मोठ्या संख्येने डॉक्टर सहभागी झाले होते.
पोलीस गांभिर्याने काम करायला घाबरतात
रुग्ण दगावला अन डॉक्टरांकडून बिल मागण्याची घाई होते मग नातेवाईक चिडतात. तेव्हा डॉक्टरांची प्रतिक्रिया सामाजिक असावी,डॉक्टरांना सुसंवाद साधता आला पाहिजे, आत्मविश्वास जीवनात संघर्ष करण्याची प्रेरणा देतो, पोलीस गांभीर्याने काम करण्यास घाबरतात त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. असे अॅड.उज्वल निकम म्हणाले.
पोलिसांना अटकेचे अधिकार
पोलिसांना अटकेचे अधिकार आहेत, अटकेचे प्रमाण वाढले की त्यांचा टीआरपी वाढतो, लीगल आयपीसी, सिपीसी आहेत. अटकेचा प्रोटोकॉल नसेल तर कारवाई होऊ शकते, डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाल्यास दोन वर्षे शिक्षा होऊ शकते. उपचारात हलगर्जी केल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जीआर मध्ये आहेत. असे पोलीस उपायुक्त प्रदीप देशपांडे म्हणाले.