वैद्यकीय अधिकार्‍यांची गैरहजेरी; रूग्ण व नातेवाईक संतप्त

0

न.पा. मुख्याधिकार्‍यांना वैद्यकीय अधिकारी नेमण्यासाठी दिले निवेदन

शिरपूर- शिरपूर शहरातील शिरपूर-वरवाडे नगरपरिषद संचलित इंदिरा गांधी मेमोरियल येथील वैद्यकीय अधिकारी गेल्या 8 दिवसांपासून रजेवर आहेत. त्यामुळे विशेषतः गरोधर स्त्रीयांचे व अति तातळीच्या उपचारासाठी येणार्‍या रुग्णांचे उपचाराअभावी हाल होत असल्याने रुग्ण व नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. भारिप बहुजन महासंघाकडून न.पा.च्या मुख्याधिकारी यानी तात्काळ लक्ष घालून वैद्यकीय अधिकार्‍याची नेमणूक अशी मागणी करत निवेदन दिले.

निवेदन देतांना यांची होती उपस्थिती
निवेदनाचा आशय असा, शिरपूर नगरपरिषद संचलित इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय चिकित्सक गेल्या आठ दिवसापासून रजेवर असल्याने रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या गोरगरीब जनतेचे हाल होत आहेत. यामुळे प्रसुतीसाठी येणार्‍या महिलांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे. ऐनवेळेस रुग्णालयात येणारे रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रुग्णालयात लवकरात लवकर वैद्यकीय अधिकारी नेमण्यात यावे तसेच उपचारासाठी येणार्‍या रुग्णाचे हाल थांबवावेत अशी मागणी करत या आशयाचे निवेदन भारिप बहुजन महासंघाने न.पा. मुख्याधिकारी याना दिले. निवेदन देतेवेळी राहुल बोरसे, रियोजद्दीन शेख, जावेद हुसैन, जुबेर शेख,रेहान काझी, तौसिफ पठाण साहिल शेख, मदिन खान, राजू कपाट आदी उपस्थित होते.