नंदुरबारः तोरणमाळ येथील वैद्यकीय अधिकार्याला पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई केल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक करुणाशील तायडे, उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या पथकाने केली.
तोरणमाळ ग्रामीण रुग्णालय येथे कार्यरत असलेले अधिपरिचालक यांना अतिदुर्गम भाग असल्याने अतिदुर्गम भत्ता 8 हजार रुपये दरमहा मिळतो. मागील वर्षाचे 96 हजार रुपयांपैकी 63 हजार रुपये मंजूर होऊन मिळाल्याने 10 टक्के प्रमाणे 6 हजार 300 रुपये बक्षीस म्हणून लाचेची मागणी करून तडजोडीअंती 5 हजार रुपये ठरवून वैद्यकीय अधिकारी ओंकार चामड्या वळवी यांनी मागणी केली होती. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात तक्रारदारकडून 5 हजाराची लाच घेताना वैद्यकीय अधिकार्यास रंगेहाथ पकडण्यात आले.