मुंबई : अभिमत विद्यापीठ आणि खासगी मेडिकल कॉलेजमधील पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयाच्या 67 टक्के जागा मराठी मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
यंदा नीट अंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबवली जात असल्याने इतर राज्यांनी तिथल्या स्थानिक मुलांसाठी अभिमत विद्यापीठात जागा राखीव ठेवल्या होत्या. परंतु महाराष्टृाने असा निर्णय घेतलाच नव्हता. महाराष्टृात 10 अभिमत विद्यापीठांमध्ये मेडिकल पोस्ट ग्रँज्यूएशनच्या 787 जागा आहेत. तर 8 डेंटलच्या अभिमत विद्यापिठांमध्ये पोस्ट ग्रँज्यूएशनच्या 264 जागा आहेत. तसेच खासगी मेडिकल कॉलेजमध्ये मेडिकलच्या 352 जागा आहेत. आता या ठिकाणी 67 टक्के जागा मराठी मुलांसाठी राखीव असतील. महाराष्ट्र सरकारने जागा राखीव ठेवण्यासंदर्भात जीआर काढला आहे.