जळगाव । डॉक्टरांच्या व वैद्यकीय क्षेत्राच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्यांसाठी इंडियन मेडिकल असोएशन या डॉक्टरांच्या संघटनेच्या वतीने दिल्ली येथे मंगळवारी 6 जून रोजी राजघाटावर धरणे आंदोलन करण्यात आले. देशभरातून दिल्लीत 4000 पेक्षा जास्त डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातून जवळपास 110 डॉक्टर तर जळगाव जिल्ह्यातून आयएमएचे चार पदाधिकारी सहभागी झाले होते.
आयएमए केलेल्या विविध मागण्या : आयएमएने प्रमुख मागण्यामध्ये पी.सी.पी.एन.डी.टी व क्लिनिकल एस्टब्लीशमेट कायद्यात सुधारणा करावी तसेच वैद्यकीय ,लेखनिक चुकांसाठी त्रुटीसाठी फौजदारी कार्यवाही करू नये. व ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत कमाल भरपाई रक्कम मर्यादा ठरवावी,मंत्री गटाच्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात, वेगवेगळे उपचार पद्धतीने अशास्रीय मिश्रण करू नये,डॉक्टरांच्या रुग्णालयांच्या नोंदी साठी ’एक खिडकी’ योजना आणावी, एमबीबीएसची ’नेक्स्ट’ परीक्षा शेवटच्या वर्षाची सामाईक एकच केंद्रीय परीक्षा घ्यावी, सरकारच्या प्रत्येक समितीमध्ये आयएमएचा प्रतिनिधी असावा, यांसह विविध मागण्या आयएमएच्या वतीने करण्यात आल्या आहे.
उपजिल्हाधिकार्याना निवेदन
आयएमएच्या पदाधिकार्यानी जिल्ह्यास्तरीय बैठक घेतली. यात देशभरात आयोजित आंदोलनाबाबत भूमिका जाणून घेण्यात आली. डॉक्टरांच्या व वैद्यकीय क्षेत्राच्या मागण्या व समस्यांसाठी आयएमए जळगाव शाखेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना निवेदन देण्यात आले. त्यात शहरासह, जिल्ह्यातील दीड हजार डॉक्टरांनी सहभाग घेतला़ होता. यावेळी अध्यक्ष डॉ़ विश्वेश अग्रवाल, सहसचिव डॉ़ स्नेहल फेगडे, डॉ़ जितेंद्र कोल्हे, डॉ़ योगेश चौधरी, डॉ़ सुशील गुर्जर, डॉ़ विवेक पाटील आदी उपस्थित होते.