बारामती : वैद्यकीय क्षेत्रात एमबीबीएस ला प्रवेश मिळविण्याकरीता दोन वर्षाचा नियोजनबध्दरित्या कार्यक्रम राबविण आवश्यक आहे. सध्या वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणार्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे स्पर्धा ही खूपच वाढत चालली आहे. यशस्वी होण्यासाठी भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र या तिन्ही विषयात प्राविण्या असण्याची गरज आहे. असे मत सप्तर्षी क्लासेसचे संचालक, प्रा.संजय होनमाने यांनी व्यक्त केले आहे.
सप्तर्षी क्लासेसच्यावतीने नीट,जेइसी,व सीइटी या प्रवेशासाठी विद्यार्थी व पालक यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात होनमाने बोलत होते. बारामती तालुक्यातील तसेच आसपासच्या तालुक्यातील फलटण, दौंड, करमाळा, इंदापूर या तालुक्यातील विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
यावेळी होनमाने म्हणाले, बर्याच विद्यार्थ्यांमध्ये तिन्हीपैकी एक किंवा दोन विषयात सखोल ज्ञान असते परंतू वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरावयाचे असेल तर भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र या तिन्ही विषयात प्राविण्या मिळविले पाहिजे जर आपणास एमबीबीएस ला प्रवेश मिळवायचा असेल तर हा संपूर्ण अभ्यासक्रम केवळ दोन महिन्यांच्या क्रॅशकोर्सच्या वर अवलंबून न राहता दहावीच्या परिक्षेनंतर लगेचच त्याच्या तयारीला सुरूवात करणे आवश्यक आहे.