महापालिकेतील शाळेत घेतले शिक्षण
पिंपरी : नेहरूनगर येथील महापालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या वैभव दीपक अब्दुले याने जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर यूपीएससी परीक्षेत उत्तुंग यश मिळवून देशात 30 वा क्रमांक मिळविला. त्यामुळे महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. वैभव अब्दुले याने यूपीएससी परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल माजी महापौर हनुमंत भोसले, नगरसेवक राहुल भोसले यांच्या हस्ते त्याचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी दीपक आब्दुले, अनिता आब्दुले, सतिश भोसले, संजय धाडगे, सलीम शेख, ऋषिकेश भोसले, ज्योती आब्दुले, एकांत आब्दुले, पुजा आब्दुले आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा
एमबीए, लॉ पदवी केली संपादन
वैभव आब्दुले हा नेहरूनगर येथील भोसले रेसिडेन्सी या ठिकाणी राहत असून त्याचे पहिली ते सातवी हे प्राथमिक शिक्षण महापालिकेच्या मुले क्रमांक 2 या शाळेत झाले आहे. आठवी ते दहावी हे संत तुकारामनगर येथील भारतीय संघटना विद्यालयात झाले. यानंतर वैभवनेेे पुण्यातील महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठिकाणी पदवी शिक्षण पूर्ण केले. यानंतर वैभवने इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एमबीए) मानवसंसाधन ही पदव्युत्तर पदवी घेतली. यानंतर पुण्यातील आय.एल.एस कॉलेजमधून कामगार कायद्याची पदव्युत्तर पदवी घेतली. याचबरोबर राष्ट्रीय पात्रता परीक्षा देखील प्रावीण्य मिळवले. या सर्व पदव्या मिळाल्यानंतर वैभवला प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा असल्याने त्याने यूपीएससी परीक्षेचा मार्ग निवडला. वैभवने 25 नोवेंबर 2017 रोजी संघ लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणार्या श्रमपर्वन अधिकारी वर्ग-2 (राजपत्रित) या पदाची परीक्षा दिली. या परीक्षेचा 5 सप्टेंबर रोजी निकाल जाहीर झाला असून वैभवने देशात 30 वा क्रमांक पटकावला आहे. त्याने यूपीएससी परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
—
कुटुंबियांच्यामुळेच हे शक्य
वैभव आब्दुले म्हणाला, मी प्राथमिक शिक्षण नेहरूनगर येथील महापालिकेत शाळेत घेतले आहे. यानंतर उच्च शिक्षण घेऊन विविध पदव्या मिळवल्या आहेत. मला प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा होती. यामुळे मी युपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. माझ्या यशामध्ये माझे आई-वडील, पत्नी, भाऊ यांचे मोठे योगदान आहे. वैभव याचे वडील दीपक आब्दुले खराळवाडी येथील महापालिकेच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक आहेत. आई अनिता आब्दुले या देखील नेहरूनगर येथील महापालिकेच्या बालवाडीमध्ये विद्यार्थ्यांना बाराखडी शिकवण्याचे काम करीत आहेत. वैभव हा सध्या पुणे येथील सुदुंबरेेे येथिल सिद्धांत कॉलेज येेेथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.