मुंबई/पुणे- हिंदू जनजागृती समितीचा कार्यकर्ता वैभव राऊतच्या घरातून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आणखी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. सोबतच त्याचा साथीदार सुधन्वा गोंधळेकर याच्या पुण्यातील घरातून सहा हार्डडिस्क लॅपटॉप, नऊ मोबाईल, अनेक सीमकार्ड, एक कार आणि मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. तर एटीएसने नालासोपारा येथे केलेल्या कारवाईमुळे 17 ऑगस्टला गावकरी मूक मोर्चा काढणार आहेत.
नारासोपारा येथील वैभव राऊतच्या घरातून 5 गावठी पिस्तूल, 3 अर्धवट तयार झालेल्या गावठी पिस्तूल, 9 एमएम राऊंड 11, 7.65 राऊंड 30, स्प्रींग्ज, ट्रिगर आदी शस्त्रास्त्रांचे सुटे भाग जप्त करण्यात आले आहेत. दुसरा आरोपी सुधन्वा गोंधळेकर याच्या पुण्यातील घरातून एक लॅपटॉप, 6 हार्डडिक्स, 5 पेनड्राईव्ह, 9 मोबाईल, अनेक सिमकार्ड्स, 1 वायफाय डोंगल, 1 कार, 1 मोटार सायकल व अनेक दस्ताऐवज जप्त करण्यात आले आहे. यावरून गोंधळेकर हा टेक्निकल एक्सपर्ट असल्याची माहिती समोर आली आहे.