मुंबई-महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसने हिंदू जनजागृतीच्या वैभव राऊतच्या घरी धाड टाकून स्फोटके पकडली. ही सगळी स्फोटके मराठा आंदोलनात घातपात घडवण्यासाठी होती असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या संदर्भातले ट्विटच जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
वैभव राऊत व त्याच्या दोन साथीदारांकडून ATS ने जप्त केलेले जवळ-जवळ ८ क्रूड बॉम्ब आणि ५० बॉम्ब बनवण्याची सामुग्री ही मराठा आंदोलनाच्या दरम्यान घातपात करण्यासाठीच होती.
महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न होता.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 10, 2018
नक्षलवाद्यांचा वकील म्हणून गडलिंगना अटक करण्यात येते तर मग सनातनचे वकील संजीव पुनाळेकर हे तर बॉम्बस्फोटातल्या आरोपींचे खुलेआम समर्थन करत आहेत त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक व्हायला हवी अशीही मागणी आव्हाड यांनी केली आहे.
नक्षलवाद्यांचा वकील म्हणून गडलिंगना अटक होते तर सनातनचे वकील पुनाळेकर जे बॉम्बस्फोटातल्या आरोपींच खूलेआम समर्थन करतात त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करायला हवीय.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 10, 2018