वैयक्तिक शौचालय योजनेतील गैरव्यवहाराची पावसाळी अधिवेशनात चौकशीची मागणी करणार : आमदार एकनाथ खडसे

Will Demand Inquiry Into Raver Malpractice in monsoon session : MLA Eknath Khadse रावेर : रावेर पंचायत समितीत झालेल्या वैयक्तिक शौचालय योजनेतील गैरव्यवहाराबाबत चौकशी सुरू असून या प्रकरणाची पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. आधीच विविध आरोप-प्रत्यारोपांमुळे पंचायत समितीची प्रतिमा प्रचंड मलीन झाली आहे.

18 संशयीतांना अटक
रावेर पंचायत समितीतील बहुचर्चित भ्रष्ट्राचार प्रकरण राज्यभर गाजत आहे. या प्रकरणी रावेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल आहे. एकूण अठरा संशयीत तुरुंगात असून मोठ्या अधिकार्‍यांसह 112 जणांवर अटकेची टांगती तलवार असतांना या प्रकरणात आता माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी लक्ष घातले आहे. या भ्रष्ट्राचार प्रकरणी सुरू असलेल्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे खडसे म्हणाले.