वैशालीला सुवर्ण

0

चेन्नई । भारताच्या आर. वैशालीने चीनमधील चेंगडू येथे झालेल्या आशियाई कॉन्टिनेन्टल ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. नऊ फेर्‍यामध्ये 8 गुण मिळवित तिने हे यश संपादन केले. क्लासिकल विभागात वैशाली व विदित गुजराथी यांना कांस्यपदक मिळाले तर पद्मिनी राऊतला ब्लिट्झमध्ये कांस्यपदक मिळाले. ब्लिट्झ विभागात एकूण 7 विजय मिळविले तर दोन डाव अनिर्णीत राखले. शेवटच्या डावात तिने मंगोलियाच्या उरिइन्तुयाला बरोबरीत रोखत अर्धा गुण मिळविला आणि खडेमलशरीयवर अर्ध्या गुणाची बढत घेत सुवर्णपदक निश्चित केले