वैशाली नाईक यांची वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयाला भेट

0

नवी मुंबई : महापालिका रुग्णालयात आरोग्य सेवांचा बोजवारा उडाला असल्याने, नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य समितीच्या उपसभापती पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच वैशाली तुकाराम नाईक यांनी वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौरा आयोजित केला होता.

यावेळी वैशाली नाईक यांनी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ रवींद्र म्हात्रे ,देऊरकर , साफ सफाई विभागाचे सुपरवाईझर यांच्यासह प्रत्येक विभागाची पाहणी करून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांविषयी माहिती घेतली . त्याचबरोबर रुग्णालयातील कँटीनची देखील त्यांनी पाहणी केली . रुग्णालयात यंत्रे सामुग्रीची , डॉकटर , कर्मचारी वर्गाची कमतरता असल्याचे या पाहणी दौऱ्यात त्यांच्या निदर्शनास आले . वैशाली नाईक यांनी सांगितले कि , आज वाशी रुग्णालयात ऐरोली , सीबीडी आणि अन्य क्षेत्रातील रुग्ण मोठ्या संख्यने उपचारासाठी येत आहेत त्यामुळे रुग्णालयावर याचा ताण पडत आहेत आणि ज्याचा परिणाम हा आरोग्य सेवांवर होताना दिसत आहे म्हणूनच आपण रुग्णालयातील आरोग्य सेवा सुरळीत व्हावी आणि रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून उपसभापती म्हणून प्राधान्याने काम करणार आणि ज्या अत्यावश्यक सेवांची तातडीने आवश्यकता असेल त्याविषयीचे ठराव आपण आरोग्य समितीबरोबरच महासभेत देखील आणणार आहोत.