आ. एकनाथराव खडसे विधानसभेत आक्रमक
३२ कोटी रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण भोवणार
सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन
हे देखील वाचा
निलेश झालटे,नागपूर- रक्ताच्या नात्यातील कुण्याही व्यक्तीचे जात वैधता प्रमाणपत्र असेल तर रक्ताच्या नात्यातील प्रत्येक व्यक्तीला पडताळणीसाठी नव्याने कागदपत्रे मागितली जाणार नाही, याचा पुनरूच्चार सरकारच्या वतीने सामाजिक न्याय राज्यमंत्री दिली कांबळे यांनी विधानसभेत केला. तर जळगाव जिल्हातील ३२ कोटींच्या शिष्यवृत्ती अपहार प्रकरणी समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त वैशाली हिंगे यांच्यावर आठ दिवसात कारवाई केली जाही अशी घोषणा समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना दिली.
माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी वारंवार उपस्थित केलेला जात वैधता पडताळणीचा मुद्दा पुन्हा लक्षवेधीच्या निमित्ताने उपस्थित केला. रक्ताच्या नात्यातील प्रत्येक व्यक्तीला पडताळणीसाठी नव्याने कागदपत्रे देण्याची गरज नसल्याचा राज्य शासनाचा निर्णय असताना जळगाव येथे पुन्हा पुन्हा तीच कागदपत्र मागवून जात पडताळणी समितीमार्फत अडवून केली जात अाहे. त्यासाठी लाखो रुपयांचे व्यवहार होत असल्याचा आरोप खडसे यांनी केला. याच भागात 32 कोटी रुपयांचा शिष्यवृत्ती घोटाळा उघड झाला. हा घोटाला सिद्ध झाला असताना सामाजिक न्याय विभागाच्या अधिकारी वैशाली हिंगे यांना राज्य शासन पाठिशी का घालते आहे, असा सवालही त्यांनी केला.
या मुद्द्यावर खडसे आक्रमक झाल्यावर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी वडीलांचे जात वैधता प्रमाणपत्र असेल तर रक्ताच्या नात्यातील प्रत्येक व्यक्तीला पडताळणीसाठी नव्याने कागदपत्रे मागितली जाणार नाही, याचा पुनरूच्चार केला. याबाबतच्या सूचना पुन्हा देण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. अधिकारी वैशाली हिंगे यांची आजच पडताळणी समितीतून बदली करण्यात येत असून शिष्यवृत्ती घोटाळ्याची सहसचिवांमार्फत चौकशी करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. मात्र, या उत्तराने खडसे यांचे समाधान झाले नाही. घोटाळा सिद्ध झाला असताना हिंगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार काय, या प्रश्नावर राज्यमंत्री कांबळे यांनी ही माहिती खरी मानून आठ दिवसांत कारवाईचे आश्वासन दिले.