पाचोरा। पाचोरा शहरातील नागरिकांना प्रतिव्यक्ती 70 लिटर पिण्यासाठी पाणी, 100 टक्के हगणदारी मुक्त शहर, 70 टक्के सी.सी.टी.व्ही बसविलेले पाचोरा शहर, सुसज्य वाचनालय, घनकचरा निवारण, संपूर्ण शहरात एलएडी योजना, रस्त्यांचे खाडीकरण, डांबरीकरण, बीओटी तत्वावर तीन मजली व्यापारी संकुल, भाविकांसाठी पाचकोटीचे राममंदिराचे सुशोभीकरण, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांचे सुशोभीकरण, हुतात्मा स्मारकाचे नुतनीकरण, साडे तिन कोटीचे स्मशान भूमीचे नुतनीकरण, 58 कोटी रूपयांचे भूमीगत गटारी, यासारख्या विविध योजना राबवून पाचोरा शहर जळगाव जिल्ह्यात पहिली स्मार्ट सीटी बनवण्याचे मानस आमदार किशोर पाटील यांनी येथील अदयावत अशा स्मशान भूमीच्या लोकापर्ण सोहळा प्रसंगी सांगीतले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा अधिकारी किशोर राजे निंबाळकर, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार आर.ओ. पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुकुंद विल्हीकर, जि.प. सदस्य पद्मसींग पाटील, रावसाहेब पाटील आदी व्यासपिठावर उपस्थित होते.
राज्यात मॉडल स्मशानभूमीसाठी प्रयत्न करु
मी माझ्या अनेक वर्षाच्या सेवेत महानगरापालिका, पालिका सह अनेक मोठमोठ्या शहरातील स्मशानभूम्या बघितल्या परंतु पाचोरा पालिकेचे बांधलेली अद्यावत अशी स्मशानभूमी मी कोठेही पाहिली नसून आमच्याद्वारे मुंबईच्या आयुक्तांना पत्र पाठवून पाचोर्याच्या स्मशान भूमीस राज्यातील मॉडेल स्मशानभूमीचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार असून ज्या-ज्या ठिकाणी स्मशान भूमीचे बांधकाम सुरु असेल तेथील अधिकारी पदाधिकार्यांना ही स्मशानभूमी पाहूनच आपण स्मशान भूम्या बांधा असे कौतुक करुन पाचोरा शहराच्या उर्वरीत किशोर राजे निंबाळकर यांनी आश्वासन दिले. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, सहाय्यक मुख्याधिकारी राजेंद्र पाटील, प्रशासन अधिकारी प्रकाश भोसले, नगर अभियंता टी.पी. भाटे, शाम केसवाणी, अरुण पाटील, वाल्मीक पाटील, सतिश चेडे उपस्थित होते.
स्मशानभूमीसाठी तीन कोटीचा खर्च
पाचोरा शहरात वैशिष्टपूर्ण योजनेतून तीन कोटीचे खर्चकरुन स्मशानभूमी बांधण्यात आली. यात भव्य असे प्रांगण वालकंपाऊंड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था भव्य असे नागरिकांना बसण्यासाठी रोड. अंत्य संस्कारासाठी पाच कठडे, श्रध्दांजली वाहण्यासाठी माईक सिस्टीम असलेले शेड, अशा विविध सुविधा असलेले अद्यावत स्वरुपाची स्मशान भूमी ही जिल्ह्यात मॉडल स्मशानभूमी तयार करण्यात आली असून भविष्यातील दोन वर्षात पाचोरा शहरात उर्वरीत सुख सुविधा पुरवलया जावून पाचोरा शहर जिल्ह्यात मॉडल शहर होणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.