सातारा – श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील दुसरा मुक्काम तरडगाव येथे करुन सोमवारी पहाटेच फलटणच्या दिशेने मार्गस्थ झाला. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी शनिवारी सातारा जिल्ह्यात आली. लोणंदमध्ये पहिला मुक्काम करुन रविवारी पालखी मार्गातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे झाले. त्यानंतर तरडगावमध्ये दुसरा मुक्काम केला.
तरडगाव येथील पालखीतळावर सोमवारी पहाटे मानकर्यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करुन अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर पहाटे सहाच्या सुमारास पालखी फलटणच्या दिशेने मार्गस्थ झाली. या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे.