वॉईन शॉप स्थलांतराचा प्रस्ताव रद्द करा

0

जळगाव। मेहरून परिसरात सुर होणार्‍या वाईन शॉप व दारू दुकानांना परवानगी देवून प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे ते प्रस्ताव त्वरीत रद्द करण्यात यावे, अश्या मागणींचे निवेदन शनिवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाला नगरसेविका सुमित्रा सोनवणे व रहिवाश्यांच्यावतीने देण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य व राष्ट्रीय महामार्गलगतच्या द्य विक्री बिअर शॉप, वाईन शॉपला मद्यविक्रीस मनाई केली असल्याने दुकानदारांनी लागलीच स्थलांतर करण्यास सुरूवात केली आहे. तर सपना कॉम्पलेक्स येथील राजुकमार मोतवानी यांचे राज वाईन्स हे मेहरूण येथील गट नं. 20/3 प्लॉट नं. 21 या ठिकाणी वाईन शॉप स्थलांतरीस करण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिलेली आहे. दरम्यान, या परिसरात कष्टकरी व श्रमीक वर्गाची मोठी वसाहत असून सदर वाइन शॉपच्या परवानगीमुळे सामाजिक शांतता व कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात पडण्याशी शक्यता आहे. रहिवाशी वस्तीत वाईन शॉपची परवानगी घेतांना नागरिकांच्या हरकती देखील न मागविता प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे. तरी वाईन शॉप स्थलांतराचा मंजुर केलेला प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा अन्यथा मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून करण्यात आला आहे. निवेदन देतांना नगरसेविका सुमित्रा सोनवणे, वैशाली भरत पवार, प्रगती पवार, उज्वला सानप, गिता सोनवणे, ज्योती सोनवणे, सुनिला जयकर, दिपाली सानप, नसरीन खान, वंदना सोनार, मंगलाबाई सपकाळे, संगिता विजय सोनवणे, मनिषा सावळे, मर्जिंना तडवी, भारती सोनवणे, छाया देशमुख, संगिता सानप, रत्नमाला पाटील आदी परिसरातील रहिवासी उपस्थित होते.