वॉटरग्रेसच्या खुलाशाची फाईल महापालिकेतून गहाळ

0

आरोग्यविभागात शोधाशोध; अधिकारी-कर्मचार्‍यांचे एकमेकांकडे बोट


जळगाव– शहरातील साफसफाई आणि कचरा संकलनासाठी मनपाने पाच वर्षासाठी एकमुस्त मक्ता दिला आहे. मात्र मक्तेदाराकडून साफसफाई समाधानकारक नसल्याने तसेच वारंवार सुचना आणि नोटीस बजावून देखील सुधारणा होत नसल्याचे लक्षात आले.त्यामुळे प्रशासनाने मक्तेदार वॉटरग्रेस कंपनीला मक्तारद्द का करण्यात येवू नये अशा आशयाची अंतीम नोटीस बजावून खुलासा मागविला होता.दरम्यान,वॉटरग्रेस कंपनीचा खुलासा आरोग्यविभागाला प्राप्त झाला.या बाबत आरोग्य अधिाकार्‍यांना विचारणा केली असता फाईल दिसून आली नाही.फाईल गहाळ झाल्यामुळे शोधाशोध सुरु झाली.

महापालिकेने शहराचा दैनंदिन स्वच्छतेचा मक्ता नाशिक येथील वॉटर ग्रेस कंपनीला सहा महिन्यापूर्वी दिला होता. परंतू पहिल्या दिवसापासूनच मक्तेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. तसेच अनेक नोटीसा देणे दंडात्मक कारवाई मक्तेदारावर करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेने मक्तेदाराला अंतिम
नोटीस देण्याचा निर्णय घेवून नोटीस बजावली होती. मक्ता रद्द का करण्यात येवू नये ? याबाबत खुलासा सादर करण्याची नोटीस दिली होती. त्यानुसार मक्तेदाराने दिलेल्या मुदतीत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे खुलासा सादर केला आहे. आरोग्य अधिकार्‍यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली

आरोग्य अधिकार्‍यांना फाईल सापडेना

सफाईच्या मक्तेदाराने खुलासा सादर केल्यानंतर ती फाईल आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांच्याकडे देण्यात आली होती. परंतू त्यांना खुलाशाची फाईल सापडली नाही. त्यामुळे त्यांनी संबंधित कर्मचार्‍याकडे विचारणा केली. यावर संबंधित कर्मचार्‍यांनी आरोग्य अधिकार्‍यांकडे असल्याचे सांगितले.यावेळी उपायुक्तांनी फाईल शोधण्यासाठी सुचना देवून ते कामानिमित्त कार्यालयाच्या बाहेर पडले.

माहिती देण्यास टाळाटाळ

सफाई मक्तेदाराच्या कामाबाबत सहा महिन्यापासून तक्रारी सुरू आहे. त्यात अंतिम नोटीस दिल्यानंतर मक्तेदाराने आरोग्य विभागाकडे खुलासा सादर केला.मात्र याबाबात माहिती देण्यात आरोग्य अधिकार्‍यांनी टाळाटाळ केली.त्यामुळे आरोग्य विभाग पून्हा संशयाच्या भोवर्‍यात अडकला आहे.