भुसावळ- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ पोलिसांकडून दररोज नाकाबंदी केली जात असून या माध्यमातून गुन्हेगारांचीदेखील तपासणी केली जात आहे. रविवारी रात्री बाजारपेठ पोलिसांनी केलेल्या तपासणीत गेल्या आठ महिन्यांपासून वॉरंट निघूनही न्यायालयात हजर न झालेल्या दोघा संशयीत आरोपींना अटक करण्यात आली. अयुब शहा हुसेन शहा (23, गौसिया नगर, भुसावळ) व संजय नारायण रोकडे (56, सरस्वती नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तपास पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस करीत आहेत.