वॉर्नरच्या पत्नीला खिलाडुवृत्ती शिकविणे महागात पडले!

0

नवी दिल्ली । रांचीत भारत व कांगारू यांच्यात तिसरी कसोटी सुरू आहे. यापुर्वी झालेल्या दुसर्‍या कसोटीत वादाला तोंड फुटले होते.ते या तिसर्‍या कसोटीतही काहींना काहीना कारणावरून सुरू आहे.हा वाद मैदानावरील असो की मैदानाबाहेर असो वाद सुरूच आहे. भारतीय खेळाडूंना खेळाडू वृत्तीचे धडे देवू करणार्‍या ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्या पत्नीला नेटिझन्सने चांगलेच धारेवर धरले.

दुखापतीवर डिवचणे हीच ऑस्ट्रेलियाची ‘स्पोर्ट्समनशीप’ आहे का?
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने रांची कसोटीत पहिल्या डावात शतक पूर्ण केल्यानंतर कोणत्याच भारतीय खेळाडूने त्याचे कौतुक किंवा टाळ्या वाजवून आदर केला नाही, भारतीय खेळाडूंना खिलाडूवृत्तीच्या मुल्याचे महत्त्वच नाही. त्यांच्यात हा गुण नाहीच, असे ट्विट वॉर्नरच्या पत्नी केले.अशा एका ट्विटवर आपली प्रतिक्रिया वॉर्नरची पत्नी कॅन्डीस वॉर्नरने दिली होती.हिच प्रतिक्रिया देणे कॅन्डीला खुप महागात पडले आहे. भारतात क्रिकेटला धर्म मानले जाते याची जाणीव ठेवून वॉर्नरच्या पत्नीने बोलावे, असा सल्लाही काहींनी देऊ केला आहे. कॅन्डीसच्या ट्विटवर नेटिझन्सने जोरदार प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली. नेटिझन्सने ऑस्ट्रेलियाच्या स्पोर्ट्सशीपचे दाखले देत आहे. याचबरोबर भारतीय समर्थकांनी तिला रांची कसोटीत कोहलीला क्षेत्ररक्षणावेळी उजव्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने क्षेत्ररक्षणावेळी कोहलीच्या दुखापतीची नक्कल करून त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला त्याच्या दुखापतीवरून डिवचणे म्हणजे ऑस्ट्रेलियन खेळाडूंची ‘स्पोर्ट्समनशीप’ आहे का?, असा सवाल नेटिझन्सने केला आहे.