पुणे । शिष्यवृत्ती परिक्षेत वॉलनट स्कूलच्या 11 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून या शाळेचे 71 टक्के विद्यार्थी ही परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका मेघा लेहेरिया आणि शिक्षिका श्रद्धा दीक्षित यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
पार्थ मायदेव, पूर्वा कुलकर्णी, श्रिया कुलकर्णी, परीक्षित गाडगीळ, सौम्य टाकळकर, समवादी दधी, अभिषेक सिंग, रिया मोरे, पियूष देशपांडे, अकीन करकरे आणि व्यंकटेश मिरासदार या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या संस्थापिका अर्पिता करकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शासनाकडून केवळ महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा महामंडळाच्या विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाते. वॉलनट ही केंद्रीय शालांत परीक्षा मंडळाची (सीबीएससी) शाळा असल्याने करकरे यांनी संस्थेकडूनच विद्यर्थ्यांना एक हजार रुपयांचे बक्षीस दिले.