वॉल्टेरी बाटासने जिंकली ऑस्ट्रेलियन ग्रापी

0

सिडनी । मर्सिडीज संघातील वॉल्टेरी बाटासने निर्विवाद वर्चस्व राखत ऑस्ट्रेलियन ग्रा पी फॉर्म्युला वन शर्यतीचे विजेतेपद मिळवले. त्याचा संघ सहकारी आणि आघाडीचा ड्रायव्हर लुईस हॅमिल्टंनला मात्र या शर्यतीतचौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. हॅमिल्टनचा कट्टर प्रतिस्पर्धी ड्रायव्हर आणि वैयक्तिक विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या सॅबेस्टीयन वेट्टलला दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या कामगिरीमुळे गुणतालिकेत वेट्टलने हॅमिल्टनवर 20 गुणांची आघाडी मिळवली आहे.

कामगिरीबद्दल चर्चा
ही शर्यत जिंकणार्‍या बोट्टासच्या कामगिरीबाबत खूप चर्चा झाली. विजयी ठरलेल्या बोटासने वेळेआधीच सुरुवात केल्याचा दावा वेट्टलने केला होता, मात्र त्याचा हा दावा खोडून काढण्यात आला. लाईटस् बंद झाल्यावरच बोटासने शर्यतीला सुरुवात केली असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. या विजयामुळे बोटासने सर्वसाधारण विजेतेपदाच्या शर्यतीत मोठी मुसंडी मारली आहे.