सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखेडेंच्या कारवाईने खळबळ
निंभोरा:- निंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील गोलवाडे येथील तापी नदीपात्रात अवैधरीरीत्या गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची गुप्त माहिती सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखेडे व सहकार्यांना मिळताच त्यांनी धाव घेत हातभट्टी उद्ध्वस्त केली तसेच रसायन नष्ट केले. पाच हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संजय विश्वनाथ तायडे यास अटक करण्यात आली. संशयीतास न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.