वोटर स्लीप वाटण्यास अडथळा आणणार्‍या मुख्याध्यापकांसह इतरांवर दाखल होणार गुन्हा

0

प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या इशार्‍याने खळबळ

भुसावळ- रावेर लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता सुरू असून मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत मात्र अनेक शाळेतील बीएलओ शिक्षकांना फोटो व्होटर स्लीप मतदारांपर्यत वाटप करू देण्यासाठी मुख्याध्यापक तसेच इतरांकडून त्रास होत असल्याच्या तक्रारी निवडणूक विभागाला प्राप्त झाल्या आहेत शिवाय भुसावळ मतदारसंघात गत निवडणुीत जिल्ह्यात सर्वात कमी मतदान झाले होते त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी बीएलओमार्फत निवडणूक दिवसाच्या पाच दिवस आधी फोटो व्होटर स्लीप मतदारांना पोहोचवण्याचे आदेश दिसून असून या प्रक्रियेत अडथळा आणल्यास संबंधीतांवर लोकप्रतिनिधी कायदा 1951 कलम 134 तसेच भारतीय दंड विधान कलम 188 अंतर्गत गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी दिला आहे.