व्देशाचे राजकारणामुळे एरंडोल दुष्काळग्रस्त नाही

0

आमदार डॉ.सतिष पाटील यांची पत्रपरीषदेत माहिती

एरंडोल – सरकार निर्माण झालेल्या समस्या गंभीरपणे घेत नसल्याचा आरोप करीत व मतदार संघात विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे सरकार व्देशाचे राजकारण करीत असून एरंडोल मतदार संघात दुष्काळ असतांना देखील दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला नाही असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतिश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. खासदार सुप्रिया सुळे यांचा गुरुवारी 11 ऑगस्ट रोजी एरंडोल येथे दौरा असून त्यांच्या उपस्थितीत दादासाहेब पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

यांची होती उपस्थिती
पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख पराग पवार, संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शिंदे, आर.डी.पाटील, डॉ.राजेंद्र देसले, नगरसेवक डॉ.सुरेश पाटील, अभिजित पाटील, डॉ.प्रशांत पाटील, शेतकी संघाचे माजी अध्यक्ष सुदाम पाटील, उमेश देसले यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर शहरातील उद्योजक, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी यांचेशी संवाद साधतील, तसेच दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

विविध कार्यक्रमांचे आयोजन
यावेळी आमदार डॉ.सतिश पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्‍याविषयी माहिती दिली.खासदार सुप्रिया सुळे 4 दिवस जिल्ह्याच्या दौऱ्‍यावर असून आठ विधानसभा मतदार संघात त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एरंडोल येथे सकाळी 8.30 वाजता दादासाहेब पाटील महाविद्यालयात त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून शासनाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देणार आहेत. तसेच दहा वाजता महिलांच्या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. या सर्व कार्यक्रमास महिला, विद्यार्थिनी, नागरिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.