व्यंकटरमणा.. गोविंदा ! च्या जयघोषाने नगरदेवळ्याचा रथोत्सव

0

नगरदेवळा – बालाजी महाराजांच्या मंत्रोच्चाराचा सुरमय ध्वनी, गोविंदा.. गोविंदा.. व्यंकटरमणा.. गोविंदा !चा जयघोष, प्रसादासाठी उंचावलेले शेकडो हात व पंचक्रोशितील भाविक भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात व सुमारे दोनशे वर्षांपेक्षा जुनी परंपरा असलेल्या बालाजी महाराज रथोत्सवास सायंकाळी 5 वाजेच्या सुरवात झाली. परंपरेनुसार येथील श्रीमंत जहागिरीदार घराण्याचे वंशज अर्जुन दिग्विजयराजे पवार यांचेहस्ते बालाजी महाराजांची व रथाचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी तालुक्याचे माजी आमदार आर.ओ. पाटील यांनी तसेच पोनि अनिल शिंदे, अमोल शिंदे, डॉ.संजीव पाटील, शिवनारायण जाधव यांनीही बालाजी महाराजांची पूजा करून दर्शन घेतले.

यांची होती उपस्थिती
यावेळी अरुण काटकर, भैया महाजन, सोनू परदेशी, राकेशबाबा थेपडे, राजेश जाधव, सिद्धार्थ पवार, नामदेव पाटील, सागर पाटील, संदीप पाटील, अभिजीत पवार, कृष्णा सोनार, दामू गढरी उपस्थित होते. 5 वाजता बालाजी मंदिराच्या प्रांगणातून रथ मिरवणुकीस सुरवात झाली सुमारे ३५ फूट उंचीच्या सुंदर रथाची सजावट सुंदर झेंडूच्या व शेवंतिच्या फुलांनी गो. शि. म्हसकर, दिलीप चौधरी, संजय भोई, किरण भोई, किरण शिंपी, समाधान तावडे, दिपक वाणी, दिलीप पाटील यांनी केली होती. रथात अग्रभागी अश्व सारथ्य करतांना अर्जुन तर रथाच्या वर हनुमान यांचे पुतळे बसविण्यात आले होते. रथास मोगरी लावण्याचे अनमोल कार्य शिवराम महाजन, अशोक सोन्नि, भैया महाजन, विजय चौधरी, अशोक महाजन, आधार महाजन, मधुकर गिरधर पाटील, भिका महाजन, अर्जुन चौधरी, राजेंद्र चौधरी, सुनील चौधरी, एकनाथ महाजन, गुलाब पाटील यांनी केले.

रथ मार्ग सुंदर रांगोळी व फुलांच्या पाकळ्यानी सजविण्यात आला होता तसेच ठिकठिकाणी रथावर भाविक भक्तांकडुन पुष्पव्रुश्टी करण्यात येत होती. रथ सराफा बाजार मार्गे वाणी गल्लीतून एस. के. पवार विद्यालयाजवळून मार्गस्थ झाला. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.स्पेशल फोर्स आर.सी.बी. प्लाटुन जळगाव तसेच भडगाव, कासोदा, पहुर येथून अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती. नगरदेवळा औट पोस्टचे पोउनि नलावडे व सर्व कर्मचारी वर्गाने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. रात्री रथ परत आल्यावर आरती होवून फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. रथोत्सव शांततेत व उत्साहात पार पाडल्याने विकास चौधरी, राजेंद्र शिरूडे, मिलिंद दुसाने, मुन्नाकाका परदेशी, मोहन तावडे, बालाजी मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित जनतेचे आभार मानले.

-फोटो आहे