व्यंकटेश शेट्टीने जिंकली मान्सून स्कूटर रॅली

0

मुंबई । विजेतेपदाचा दावेदार म्हणून गणल्या गेलेल्या व्यंकेटश शेट्टीने अपेक्शित कामगिरी करताना स्पोर्ट्सक्राफ्ट आयोजित गल्फ मान्सुन स्कुटर रॅली स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. एप्रिला एसआर 150 गाडीवर सहभागी झालेल्या व्यंकेटशने सय्यद असिफ अली, शमीम खान, रुस्तम पटेल, मनजीत सिंग बासन आणि अवतार सिंग या माजी विजेत्यांना मागे टाकत 35 किलोमीटर अंतराची ही स्पर्धा 25 मिनीटे 15 सेकंदात पूर्ण केली.

दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकसाठी चांगलीच चुरस पहायला मिळाली. त्यात एप्रिला एसआर 150 या गाडीवर आरुढ झालेला पुण्याचा पिंकेश ठक्करने अवघ्या एक मिलीसेकंदाच्या फरकाने माजी विजेत्या सय्यद असिफ अलीला मागे टाकत दुसरा क्रमांक पटकावला. पिंकेशने 25 मिनीटे 25 :43 सेकंद अशी वेळ नोंदवली.