व्यंगचित्रकारात जुलमी राजवट उलथवून टाकण्याची क्षमता: राज ठाकरे

0

मुंबई :आज जागतिक व्यंगचित्रकार दिन, त्यानिमित्ताने व्यंगचित्रातून विरोधकांचा समाचार घेणारे राजकीय व्यक्तिमत्व असलेले राज ठाकरे यांनी आपल्या खास ठाकरे शैलीत व्यंगचित्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्यंगचित्रकारात एखादी जुलमी राजवट उलथवून लावण्याची क्षमता असते, असा खोचक टोला राज यांनी भाजपला लागवला आहे.

व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यात इतकी ताकद असते की एखादी जुलमी राजवट उलथवली जाऊ शकते. आज जागतिक व्यंगचित्रकार दिन आहे. ह्या निमित्ताने देशभरातील माझ्या व्यंगचित्रकार सहकाऱ्यांना शुभेच्छा तर आहेतच पण तुमच्या प्रतिभेची देशाला आज सगळ्यात जास्त गरज आहे हे मात्र विसरू नका असे ट्वीट राज ठाकरे यांनी केले आहे.

राज ठाकरेंचा व्यक्तीमत्व जरी राजकीय असले, तरी त्यांनी आपल्या व्यंगचित्रातून अनेकांवर राजकीय आसूड ओढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर त्यांनी अनेकवेळा टीका केली आहे.