भुसावळ । आदर्श व्यक्तिमत्व असणे ही काळाजी गरज आहे आणि असे व्यक्तिमत्व जपण्यासाठी संस्काराची गरज असते. शालेय जीवनात मिळालेले ज्ञान व संस्कारांचा जीवनात उपयोग करा तसेच समाजाच्या उपयोगी पडा, असे आवाहन संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बापू मांडे यांनी केले. येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात ज्ञानज्योत आदान प्रदान या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांतर्गत इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनींना सदिच्छापूर्ण निरोप देण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
याप्रसंगी मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष सोनू मांडे, सचिव उषा पाटील, मुख्याध्यापिका प्राची देसाई, पर्यवेक्षिक सुरेश शिंदे उपस्थित होते. विद्यार्थीनी साक्षी देशपांडे, शितल लोढे, रुषिका पाटील, प्रांजल शंखपाळ यांनी आपल्या शाळेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन भावनिक झाल्या असल्याचे दिसून आले.
यांनी घेतले परिश्रम
या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका प्राची देसाई व शिक्षिका सोनाली राणे यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनंदा भारुडे, परिचय सुरेखा चौधरी तर आभार अर्चना पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.