पानशेत । पानशेत येथे निसर्ग महिला बालकल्याण व कृषी विकास संस्था खानापूर आणि क्रीडा व युवक सेवा, संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय मोफत व्यक्तिमत्व विकास शिबीर आयोजित करण्यात आले होते. पानशेत आणि परिसरातील 50 युवक-युवतींनी या शिबिरात भाग घेतला. यावेळी अनेक मान्यवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये व्यक्तिमत्त्व म्हणजे काय?, ते विकसित करण्यासाठी वेळेचे असलेले महत्त्व, आपली वक्तृत्वशैली प्रभावी होण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न, बाह्य आणि अंतर्गत मनाचा विकास, आत्मविश्वास या गोष्टींवर अशोक गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जीवनावर ओंकार यादव यांचे व्याख्यानही झाले. या कार्यक्रमप्रसंगी निसर्ग महिला बालकल्याण व कृषी विकास संस्थेची माहिती अध्यक्ष हनुमंत कुंभार यांनी दिली. शिबिरात सहभागी सर्व युवक-युवतीांना प्रमाणपत्रे देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सचिव निसर्ग महिला बालकल्याण व कृषी विकास संस्थेचे संजय फडतरे यांनी मानले.