नवी दिल्ली । ऑक्टोबरपर्यंत व्यक्तीकेंद्रीत बीसीसीआयला साचेबद्ध संघटनेत बदलणार असल्याचे सांगत व्यक्तीकेंद्रीत संघटनेचे शटर डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. सीओएप्रमुख विनोद राय यांच्या अनुसार त्यांची कार्यकारिणी येत्या ऑक्टोबरपर्यंत निवडली जाईल असेही त्यांनी सांगितले. आर. एम. लोढा समितीच्या सुधारणांना लागू करण्यासाठी वेळ देण्यात आला असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
राय यांच्या समितीच्या 100 दिवस पूर्ण झाल्याप्रित्यर्थ बोलताना सांगितले, ‘आता कमी वेळ राहिला आहे. याचा अंत ऑक्टोबरमध्ये होईल. मी यतार्थवादी आहे कारण मला सीओएसाठी बीसीसीआयमध्ये बराच काळ कोणतेही पद दिसत नाही. आम्ही बीसीसीआयमध्ये नसलेली पद्धत देऊ इच्छितो. व्यक्तीकेंद्री पद्धतीने सध्या काम चालविले जात आहे. आम्ही अशी संरचना करीत आहोत, ज्यामुळे ही पद्धत काम करेल. राय यांच्या अनुसार समन्वय आणि चर्चा पुढे नेण्याची एक पद्धत आहे. इंग्लंडमध्ये पुढील महिन्यात होणार्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या कराराचे नूतनीकरण करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. कुंबळे यांची गतवर्षी वेस्ट इंडिज दौर्याच्या वेळी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. जूनअखेरीस त्यांचा करार संपणार आहे. भारतीय क्रिकेट मंडळाच्या एका ज्येष्ठ पदाधिकार्याने सांगितले की, कुंबळे यांच्याबरोबरच्या कराराचे नूतनीकरण होण्याची दाट शक्यता आहे. मात्र चॅम्पियन्सनंतर बीसीसीआयची आमसभा असून त्यात अधिकृत निर्णय घेतला जाईल. फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांचीही चॅम्पियन्सपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.