व्यक्तीमत्व विकासामुळे मानव समृध्द होतो

0

वरणगाव । प्रत्येक व्यक्तीने आपले व्यक्तीमत्व दुसर्‍याला प्रभावित करेल व दुसर्‍याला सतत प्रेरणा देईल, आदर्श निर्माण करेल अशा स्वरूपाचे व्यक्तीमत्व घडवत असताना प्रत्येकाने मी पणा सोडून दिला पाहिजे व आपण माणुसकी जोपसली पाहिजे, व्यक्तीमत्व विकासामुळे मानव समृध्द होतो असे प्रतिपादन प्रा. डॉ. अविनाश बडगुजर यांनी केले. ते जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी कला विज्ञाण आणि वाणिज्य महाविदयालयाचे प्राचार्य अनंतराज पाटील, उपप्राचार्य के.बी. पाटील, प्रा. बी.जी. देशमुख आदीनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पुजन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

उच्च ध्येय ठेवून ज्ञान प्राप्तीच्या मागे लागावे
प्रा.डॉ. बडगुजर म्हणाले की, आपण अहंकार दूर केला पाहिजे, नेहमी प्रेम करायला शिकले पाहिजे तसेच चेहर्‍यावर कायम हस्य ठेवले पाहिजे, यश मिळविण्यासाठी सतत प्रयत्न करणे गरजेचे आहे. अपयशातच यश दडलेले असते. नेहमी उच्च ध्येय ठेवून ज्ञान प्राप्तीच्या मागे लागले पाहिजे, आपण तिरस्कार करणे सोडून देवून सर्वांशी मैत्री पूर्ण संबध निर्माण कारावे. हे आपल्या आचरणात आल्यास निश्चीतच आपले व्यक्तीमत्व दुसर्‍यांना आवडेल यात शंका नाही. कार्यक्रमाची प्रास्ताविका प्रा. निखील चौधरी यांनी केली. तर सूत्रसंचालन व आभार बी.जी. देशमुख यांनी मानले.