जळगाव । शहरतील मेहरुण अक्सानगर येथील रहिवासी तीसवर्षीय विवाहीतेचा तीच्या सासरच्या मंडळींकडून पाच लाख रुपयांसाठी छळ होत असल्या प्रकरणी औद्योगीक वसाहत पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पतीला उद्योग-धंद्या ला लावण्यासाठी सासरची मंडळी पैशांची मागणी करुन सतत मारहाण करीत असल्याचे तीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मेहरुण येथील माहेर व सुरत (गुजरात) येथील सासर असलेल्या अफसानाबी इम्रान खान (वय-30) या विवाहीतेने आज औद्योगीक वसाहत पोलिसांत पतीसह सासरच्या मंडळी विरुद्ध तक्रार दिली आहे. त्यात नमुद केल्या प्रमाणे पती इम्रान, सासु जकीया, सासरा निसार, दिर परवेझ, दिरानी नफीसा यांच्या कडून लग्न झाल्या पासुन 1 एप्रील 2015 ते आज तयागत मारझोड व त्रास होत असुन पती इम्रान ला उद्योग धंद्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणावे म्हणुन मारझोड करण्यात येत असल्या प्रकरणी औद्योगीक वसाहत पोसिलांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.