व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

0

नारायणगांव : विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना केवळ पैसा न पाहता आवड, क्षमता ओळखून समाज उपयोगी करिअर निवडावे असे विचार ज्ञाता संस्था ओतूरचे संस्थापक ज्ञानेश्‍वर ढोमसे यांनी मांडले.जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने कुलस्वामी खंडेराय विद्यालय व जि.प. प्राथमिक शाळा हिवरे तर्फे नारायणगाव येथे ‘व्यवसाय मार्गदर्शन व स्मरणशक्ती वर्धन’ कार्यशाळेत ज्ञानेश्‍वर ढोमसे बोलत होते.याप्रसंगी जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतिलाल बाबेल, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी वागदरे, मुख्याध्यापक भालचीम सर, विज्ञान संघाचे उपाध्यक्ष यशवंत दाते, सचिव तानाजी वामन, खजिनदार बबन नलावडे, अभिजित तांबे सर्व शिक्षक व 250 विद्यार्थी उपस्थित होते.

शाळेला वैज्ञानिक पुस्तकांची भेट
जुन्नर तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष रतिलाल बाबेल म्हणाले की, करिअर निवडताना आवड, क्षमता, संधी यांचा विचार करा. आर्थिक कुवत व बुद्धिमत्ता याचबरोबर पालक,शिक्षक यांचा सल्ला घ्या.राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने संघाचे उपाध्यक्ष मुख्याध्यापक यशवंत दाते यांनी वैज्ञानिक प्रयोग कापूर खाणे, ब्लेड खाणे, आग लावणे यासारखे अनेक प्रयोग करून दाखविले व त्यामागील वैज्ञानिक तत्व समजावून सांगितले. जि.प.शाळा हिवरे तर्फे नारायणगाव शाळेला 36 वैज्ञानिक पुस्तके जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाच्या वतीने भेट देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष रतिलाल बाबेल, सूत्रसंचालन तानाजी वामन तर आभार मुख्याध्यापक टी.बी.वागदरे यांनी मानले.