जळगाव : शहरातील वूडलॅण्ड रेस्टारंटच्या व्यवस्थापकाच्या डोक्यात बिअरची बाटली मारून गंभीर दुखापत करण्यात आली. या प्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पैसे मागितल्याने राग अनावर
जळगाव शहरातील प्रताप नगरातील वुडलँड रेस्टॉरंटमध्ये व्यवस्थापक म्हणून विठ्ठल सुपडू कोळी (32, अयोध्या नगर, जळगाव) हे काम पाहतात. गुरूवार, 5 मे रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास दारूचे पार्सल घेण्यासाठी पंकज अंबादास सोनवणे हा तिथे आला. त्याने विठ्ठल कोळी यांना दारूचे पार्सल मागितले. पार्सल दिल्यावर पार्सलचे एकूण 690 रुपये मागितले. याचा राग आल्याने पंकज सोनवणे यांने शिविगाळ करून रेस्टॉरंट बाहेर निघून गेला व बाहेर दुचाकीची तोडफोड केली. आवरण्यासाठी विठ्ठल कोळी गेले असता त्यांच्या डोक्यात बिअरची बाटली डोक्यावर मारली. यात विठ्ठल कोळी हे जखमी होवून बेशुध्द झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या प्रकरणी विठ्ठल कोळी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी पंकज सोनवणे (कांचन नगर, जळगाव) याच्या विरोधात जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार फिरोज तडवी करीत आहे.