गटशिक्षणाधिकारी विजय पवार : तंबाखूमुक्त शाळा अभियानावर प्रशिक्षण कार्यशाळा
वाघोदे- व्यसनमुक्त भावी पिढी घडवण्याची जबाबदारी शाळा व शिक्षकांची असून सहशालेय उपक्रम, अभ्यासक्रमाद्वारे तंबाखुचे दुष्पपरीणाम विद्यार्थ्यांना पटवून द्यावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी येथे केले. पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे वाघोदे विद्यालयाच्या सभागृहात मुख्याध्यापकांसाठी ‘तंबाखूमुक्त शाळा अभियान’ अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. ुमारे 250 शाळांचे मुख्याध्यापक सहभागी झाले. याप्रसंगी तज्ञ मार्गदर्शक पदवीधर शिक्षक गौस खान व बाविस्कर यांनी तंबाखूमुक्त शाळेचे 11 निकष स्पष्ट केले. सलाम मुंबई फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
यासपीठावर मुख्याध्यापक एन.व्ही.पाटील, बी.टी.सपकाळे, केंद्रप्रमुख हारुण जमादार, हुसेन तडवी, के.पी.चौधरी, रागिणी लांडगे यांची उपस्थिती होती. केंद्र प्रमुख राजेंद्र सावखेडकर व दीपक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन विषय तज्ज्ञ प्रफुल्ल मानकर यांनी तर विषय तज्ज्ञ एल.आर.पाटील यांनी आभार मानले. प्रसंगी शाळांच्या ऑनलाईन कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यात उत्कृष्ट काम केलेल्या खानापूर, खिरवड, कुंभारखेडा, रसलपूर, थोरगव्हाण या केंद्रातील प्रमुखांचा सत्कार करण्यात आला तसेच गतवर्षी तंबाखू मुक्त शाळा अभियान प्रभावीपणे राबविल्याबद्दल खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयाचा गौरव करण्यात आला.रावेर तालुक्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्याची शपथ घेण्यात आली.