वरणगाव । भारताला महासत्ता बनवायचे काम युवकच करू शकतात. पण हा युवक व्यसनमुक्त आणि शिस्तप्रिय असला पाहिजे. युवकांनी भगतसिंग, विवेकानंदाचा आदर्श घेतला पाहिजे. भारतीय संस्कृती आणि परंपरा जगात श्रेष्ठ आहे. त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आपल्याला देवही व्हायचे नाही. आणि दानवं ही व्हायचे नाही. पण आपल्याला मानव बनायचे आहे. स्वाभिमानी असन चांगल असते पण स्वाभिमानाला अभिमानात परिवर्तीत होवू देवू नका असे प्रतिपादन माजी सैनिक नागेश कुलकर्णी यांनी वरणगाव महाविद्यालयाच्या विशेष हिवाळी शिबीराचे पिंपळगाव जिल्हा परिषद शाळेत उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
शिबीर उद्घाटन सोहळ्यास यांची होती उपस्थिती
यावेळी प्रमुख पाहुणे सरपंच वत्सला भील, उपसरपंच प्रविण पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य अनंतराज बी. पाटील, उपप्रचार्य के.बी. पाटील, पोलिस पाटील उमाकांत महाजन, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना पाटील, ग्रामपंचायत सदस्या सुनिता जोहरे, शालू जोहरे, कविता जोहरे, हरी इंगळे, महाविद्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक पी.एस. लाड, माहिला कार्यक्रम अधिकारी वृक्षाली जोशी, संध्या निकम, प्रा.एन.एस. धांडे, प्रा. राहुल संदाशिव, प्रमोद भोईटे, पत्रकार मनोहर लोणे, सुरेश महाला, विनोद सुरवाडे आदी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थी स्वयंशिस्त पाळतात
प्राचार्य अनंतराज पाटील म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी स्वयंशिस्त पाळतात. स्वच्छतेचे महत्व जाणून समाजात जनजागृती करीत असतात. विद्यार्थी गावात बेटी बचाव, बेटी पढाव, कॅशलेस भारत स्वच्छ भारत साक्षर भारत आणि जनजागृती करतील त्यांचा निश्चीतच आमच्या गावाला उपयोग होईल असे सरपंच प्रविण पाटील यांनी सांगीतले. कार्यक्रमाची प्रास्ताविका राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अनिल शिंदे यांनी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विदयार्थी प्रतिनिधी नितीन पाटील, पुनम कोळी आदी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अशोक चिते यांनी केले तर आभार प्रा अनिल शिंदे यांनी मानले.