व्यसनांमुळे स्वतःचे अन् कुटुंबाचेही आयुष्य उद्धवस्त

0

अभिनेता अनुपसिंग ठाकुर यांचे प्रतिपादन

चाळीसगाव – कोणत्याही प्रकारची नशा करण्याचे व्यसन मनुष्याचे आणित्याच्या कुटुंबाचे आयुष्य उद्धवस्त करते. व्यसन म्हणजे जिवंतमरण असुन व्यसन सोडा, फुलेल जीवन असा सल्ला देत प्रत्येकाने व्यसनांपासून स्वतःस दूर ठेवावे असे आवाहन सुप्रसिध्द बॉलीवूड, टॉलीवूड अभिनेता अनुपसिंग ठाकुर यांनी व्यसनमुक्त कार्यक्रमात केले.
व्यसनमुक्त महाराष्ट्र या अभियानातंर्गत या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील आ. बं. हायस्कूलच्या प्रांगणात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगल सिंग राजपूत होते. कार्यक्रमास अभियानाच्या प्रमुख सुचिता राजपूत, शहीद जवान स्मृती वंदन समिती अध्यक्ष डॉ. सुनील राजपूत, आयएमएच्या माजी अध्यक्ष डॉ.उज्वला देवरे, सिटी केयर हॉस्पिटलचे डॉ सी. टी. पवार, मिलिंद देशमुख, डॉ. पायल पवार, डॉ. स्वर्णसिंग राजपूत, आई फाऊंडेशनच्या डॉ. चेतना कोतकर, डॉ. एम. बी. पाटील, जयदीपसिंग राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. अनुप भारती, महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, युगंधरा फाऊंडेशन अध्यक्षा स्मिता बच्छाव, प्रतिभा राणा आदीनी व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन केले.

सुदृढ राहण्यासाठी नियमित व्यायाम करा
आयुष्य हे खुप सुंदर आहे. व्यसन केल्याने आजार उद्भवतो व जिवन संपते. आजाराची लागण होऊ द्यायची नसेल तर व्यसनांपासुन दुर रहा. आजची तरुणाई व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे एैन तारूण्यातच त्यांचे जीवन उध्वस्त होते. व्यसनापासुन दूर राहून आयुष्य आनंदात जगता येते असे अभिनेता अनुपसिंग ठाकुर यांनी मार्गदर्शनात सांगितले.

व्यसन हा आजार
प्रास्ताविकातुन व्यसनमुक्ती अभियानाच्या प्रमुख सुचिता राजपूत यांनी सांगितले की, प्रशिक्षण घेऊन व्यसनमुक्त अभियानाची सुरुवात केली. चाळीसगाव हे आपले गाव असल्याने व्यसनमुक्त अभियान गावापासून सुरु केले असल्याचे त्यांनी सांगितले.

व्यसनामुळे संसार उध्दवस्त
कोणतेही व्यसन हे मनुष्यासाठी हानीकारक असुन व्यसनातून कर्करोग व अन्य दुर्धर आजार होतात. व्यसनामुळे संसार उध्द्वस्त होवुन महिलांना त्रासाला सामोरे जावे लागते. प्रत्येकाने व्यसनमुक्त होवुन एक नवा समाज घडवावा, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांनी केले. व् तरूणांनी व्यसनांपासुन दूर रहावे, असे आवाहन युगंधरा फाउंडेशनच्या अध्यक्षा स्मिता बच्छाव यांनी केले. सूत्रसंचालन शालीग्राम निकम यांनी केले. आभारप्रदर्शन डॉ. विनोद कोतकर मानले. कार्यक्रमासाठी पप्पु राजपूत, निलेश राजपूत, मुन्ना राजपूत, राजु पाटील, रयत सेनेचे गणेश पवार, सुनिल राजपुत, सविता राजपूत यांनी परीश्रम घेतले.