शहादा । देशातील तरूण हेच देशाचे आधारस्तंभ असल्याने तरूणांनी व्यसनाच्या मागे न लागता चांगले शिक्षण घेऊन देशाच्या विकासात मोलाची कामगिरी बजवावी असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी एम. बी. पाटिल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना केले. ते वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांशी हितगुज करतांना बोलत होते.
मार्गदर्शन करतांना पाटील पुढे म्हणाले की, जनतेच्या मदतीशिवाय पोलीसांचे कार्य पुर्ण होऊ शकत नाही. म्हणून सर्वांनी पोलीसांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवावी. विद्यार्थ्यांनी जिवनात एक निश्चय, ध्येय डोळ्यासमोर ठेऊन त्या दिशेने वाटचाल करावी. मोबाईचा योग्य वापर केला पाहिजे. सण उत्सव साजरा करतांना कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी. प्रा संजय जाधव यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सुनिल सोमवंशी यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
संस्थेचे विभागीय सचिव प्रा.संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी एम. बी. पाटील प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून समन्वयक संजय राजपूत, उपप्राचार्य आर. जे. रघुवंशी, पर्यवेक्षक सुनिल सोमवंशी हे यावेळी व्यासपिठावर उपस्थित होते.